Type Here to Get Search Results !

चीनला मोठा झटका ! भारतीय इलेक्ट्रिक इंडस्ट्रीने रद्द केल्या अनेक ऑर्डर्स


चीनला मोठा झटका ! भारतीय इलेक्ट्रिक इंडस्ट्रीने रद्द केल्या अनेक ऑर्डर्स
नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील वाढत्या संघर्षानंतर भारताकडून चीनमधून मागवण्यात येणारे सामान बहिष्कृत केले जात आहे. एका मीडिया अहवालातील वृत्तानुसार गेल्या काही दिवसात भारतीय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीने चिनी कंपन्यांच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात रद्द करण्यास सुरूवात केली आहे. आता या ऑर्डर्ससाठी नवीन पर्याय शोधण्यात येत आहे. या कंपन्या मुख्यत्वे पॉवर डिस्ट्रिब्यूशन आणि ट्रान्समिशन गिअरच्या ऑर्डर्स रद्द करत आहेत. इतर देशामध्ये यांची किंमत जरी अधिक असली तरी त्याठिकाणाहून या ऑर्डर्स मागवण्यात येणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्याचा आवाहन केल्यानंतर यासंदर्भातील पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. या मीडिया अहवालानुसार इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष आरके चुघ म्हणाले, इंडस्ट्रीमध्ये कच्च्या मालाव्यतिरिक्त सुद्धा इतर सामान चीनवरून मागवण्यात येत होते. इंडस्ट्री सध्या पर्याय शोधत आहे, जेणेकरून चीनकडून होणारा हा पुरवठा थांबवण्यात येईल.
जोपर्यंत आपण र्पू्णपणे आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत या सामानाचा पुरवठा करणारे मित्रदेश अर्थात जपान, तैवान, कोरिया आणि जर्मनीमधून त्याची मागणी केली जाईल. सॉफ्टवेअरची आयात यूरोपमधून केली जाऊ शकते तर इतर कच्च्या मालासाठी रशिया, चेक रिपब्लिक आणि पोलंडकडे मागणी केली जाऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies