भाजप प्रदेश अध्यक्षांच्या नावे खंडणी मागणाऱ्याला अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

भाजप प्रदेश अध्यक्षांच्या नावे खंडणी मागणाऱ्याला अटक


भाजप प्रदेश अध्यक्षांच्या नावे खंडणी मागणाऱ्याला अटक 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हा तरुण पुण्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका खाजगी रुग्णालयात फोन करून त्याने 25 लाखांची खंडणी मागितली होती. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलतोय असं ही तो म्हणाला होता. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ही रक्कम द्यावी अशी मागणी त्याने केली होती.



खासगी रुग्णालयाला 18 जुलै रोजी हा फोन आला होता. फोन येताच रुग्णालय प्रशासनाने चंद्रकांत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांच्या नावाचा अज्ञातांनी वापर केल्याचा समोर आलं होतं. ‘मी कोणत्याही पैशांची मागणी केलेली नाही. तुम्ही संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा, अशी सूचना चंद्रकांत पाटील केली. त्यानंतर निगडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. तो कोणासाठी काम करतोय? हे तपासात समोर येईल.



आरोपीने ज्या मोबाईलवरुन हा फोन केला होता, तो देखील चोरीचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. ज्या व्यक्तीचा हा मोबाईल होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर फोन करणाऱ्याने चोरीच्या मोबाईलचा वापर केला होता. पण मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार मालकाने न दिल्याने, त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise