भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही : बाळासाहेब थोरात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही : बाळासाहेब थोरात


भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही : बाळासाहेब थोरात
मुंबई : दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाराऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपला निशाण्यावर घेत त्यांना दूध दरासाठीचं आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं म्हणाले.
’भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही’, असं म्हणत भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलनही करत होते. पण, त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सरकार जातानाच त्यांनी थोडी मदत केली, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला जोरदार टोला लगावला. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे असं म्हणत थोरात यांनी भाजपला मात्र आंदोलनाचा अधिकार नाही असे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Advertise