भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन


भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन
शिर्डी : ’राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागण झालेले कोरोना आहे’ अशी टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल राज्यात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनं केली. भाजप नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी शरद पवारांची बाजू घेत पडळकरांना चांगलेच फटकारून काढले आहे.
भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी पत्र लिहून शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या पत्रात त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल दु:ख व्यक्त केले.
गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवर टीका ही दुर्दैर्वी आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं.
’आपण भाजप पक्षात जरी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे, त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी भरीव काम केले आहे. त्यांचे हे योगदान नाकारून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे’, अशा शब्दात पिचड यांनी पडळकरांना फटकारून काढले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise