विकास दुबेच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल उघड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

विकास दुबेच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल उघड


विकास दुबेच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल उघड
कानपूर : कुख्यात गुंड विकास दुबे याचा शवविच्छेदन अहवाल रविवारी प्राप्त झाला. यामध्ये त्याचा मृत्यू गोळी लागल्याने रक्तश्राव झाल्यामुळे आणि धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
10 जुलै रोजी मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असताना विकास दुबे पोलीस चकमकीत मारला गेला होता. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना कानपूर जवळील भाऊंटी येथे झालेल्या चकमकीत विकास दुबेने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. दुबेची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
3 जुलै रोजी विकास दुबे आणि त्याची साथीदारांनी 8 पोलिसांची हत्या केली होती. यानंतर दुबे फरार झाला होता. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल मंदिरात 9 जुलैला दुबे याला ताब्यात घेण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Advertise