उद्यापासून आटपाडी ३ दिवस कडकडीत बंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 23, 2020

उद्यापासून आटपाडी ३ दिवस कडकडीत बंद


उद्यापासून आटपाडी ३ दिवस कडकडीत बंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने आटपाडी शहर उद्या पासून ३ दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज आटपाडी शहरामध्ये ३ पोलीसासह एकूण ६ जण  तर तालुक्यातील लेंगरेवाडी येथील २ जण असे तालुक्यात एकूण ८ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे तातडीने आटपाडी ग्रामपंचायत येथे ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर, माजी सभापती तथा पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन देशमुख, ग्रामपंचायतीचे सदस्य, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत (तात्या) पाटील, माजी जि.प.सदस्य तानाजी पाटील, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार असे सलग तीन दिवस संपूर्ण कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Advertise