सध्या डॉक्टर हाच खरा देव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

सध्या डॉक्टर हाच खरा देव

जयंत पाटील

सध्या डॉक्टर हाच खरा देवनाशिक : कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. 


आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदार संघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं. राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही, पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे पण धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीच्या बाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील,’ असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.


No comments:

Post a Comment

Advertise