सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 8, 2020

सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी दि. 9 जुलै 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
 एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केटस् व दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व मार्केटस् व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या कालावधीत शासन निर्देशानुसार बदल करून आता अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व मार्केटस व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस चालू राहतील त्यांना वेळेचे बंधन नाही. 
वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise