140 किलो वजनाच्या क्रिकेटपटूचा अफलातून कॅच...पाहा Video - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

140 किलो वजनाच्या क्रिकेटपटूचा अफलातून कॅच...पाहा Video


140 किलो वजनाच्या क्रिकेटपटूचा अफलातून कॅच...पाहा Videoइंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. जोस बटलर आणि ऑली पोप यांनी दमदार भागीदारी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 4 बाद 258 धावांपर्यंत मजल मारून दिली. 
परंतु या सामन्यात विंडीजचा 140 किलो वजनाचा फिरकीपटू रहकीम कोर्नवॉल याला संधी दिली. त्याने या संधीचे सोने करीत अफलातून झेल घेत पहिल्या दिवसाच्या चर्चेचा विषय बनला.सुरुवातीला नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केमार रोचनं पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलमीवीर डॉम सिब्ली याला बाद केले. कर्णधार जो रूट ( 17) धावबाद आणि बेन स्टोक्स (20)  यालाही फार कमाल दाखवता आली नाही. रोरी बर्न्स आणि ऑली पोप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बर्न्स माघारी परतला. स्लीमध्ये उभ्या असलेल्या रहकीमनं चपळाईनं त्याचा झेल टिपला. बर्न्स 57 धावा करून माघारी परतला. त्यानंतर पोप आणि बटलर ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून बसली.
 दोघांनी दिवसअखेर इंग्लंडचा एकही फलंदाज बाद होऊ दिला नाही. पोप 142 चेंडूंत 11 चौकारांसह 91 धावांवर, तर बटलर 120 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 56 धावांवर खेळत आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise