आदित्य कृषी केंद्रामुळे अजनाळे गावाच्या वैभवात भर : राणी कोळवले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 27, 2020

आदित्य कृषी केंद्रामुळे अजनाळे गावाच्या वैभवात भर : राणी कोळवले


आदित्य कृषी केंद्रामुळे अजनाळे गावाच्या वैभवात भर : राणी कोळवले
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : डाळिंबाचा कॅलिफोर्निया  म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या अजनाळे गावामध्ये आदित्य कृषी केंद्र या नवीन उद्योगामुळे अजनाळे गावाच्या वैभवामध्ये भर पडणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सभापती राणी कोळवले यांनी व्यक्त केले. बंडू पुजारी  यांनी नवीन सुरू केलेल्या आदित्य कृषी केंद्र या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सरपंच अर्जुन कोळवले, प्रा.हणमंतराव कोळवले, मधुकर पुजारी, संतोष कोळवले, युवा नेते संदीप पाटील, बाळासाहेब पुजारी, माणिक कोळवले, सुनिल कोळवले, सचिन येलपले, गणेश येलपले, शरद कोळवले, अक्षय येलपले, रवींद्र येलपले, अनिल लाडे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना त्या म्हणाला, आदित्य कृषी केंद्र मधून शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या खते औषधे योग्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकर्यांयचा विश्वास संपादन करून लवकरच आदित्य कृषी केंद्र अजनाळे व आसपासच्या परिसरामध्ये आपले नाव लौकिक करेल. या कार्यक्रमाला शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सदर दुकानाचे उद्घाटन सोमवार दिनांक २७ जुलै रोजी संपन्न झाले.

No comments:

Post a Comment

Advertise