Type Here to Get Search Results !

कोविड रूग्णांवर उपचारासाठी बामणोली येथील ‘हे’ हॉस्पीटल अधिग्रहित


कोविड रूग्णांवर उपचारासाठी बामणोली येथील ‘हे’ हॉस्पीटल अधिग्रहित
माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : सद्यस्थितीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी जी रूग्णालये बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत नोंदणीकृत आहेत, अशा खाजगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात येत आहेत. 

बामणोली येथील विवेकानंद हॉस्पीटल हे महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गतही सूचीबध्द आहे. या हॉस्पीटल मधील 50 बेडस् अधिग्रहित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

रूग्णालयात कोव्हिड रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित करावा. यामध्ये संशयीत कोव्हिड व कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची तात्काळ सोय करावी. 

तसेच आयसीयु चे सर्व बेडस् फक्त कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांसाठी राखीव ठेवावेत. त्यासाठी डीएमईआर व डीएचएस विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई मार्फत निर्गमित केलेल्या उपचार प्रणालीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून उपचार करण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कामात हजगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार आणि Section 2(a)(iii) Maharashtra Essential Services Maintenance Act 2005 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. 

तसेच सदर रूग्णालयाच्या आस्थापनेवर कार्यरत सर्व कर्मचारी कर्तव्य ठिकाणी उपस्थित राहून कर्तव्य बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरूध्द कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.


ज्या नागरिकांना कोविड-19 बाबत उपचार घ्यावयाचे असतील त्यांनी शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार विवेकानंद हॉस्पीटल बामणोली येथे उपचार घ्यावेत, असे आवाहनही केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies