लाचखोर पोलीस नाईका विरुद्ध गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

लाचखोर पोलीस नाईका विरुद्ध गुन्हा दाखल


लाचखोर पोलीस नाईका विरुद्ध गुन्हा दाखल 

सोलापूर : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सहा हजाराची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस नाईका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सयाजीराव लक्ष्मण होवाळ (वय ५२ वर्षे, पद- पोलीस नाईक, मोहोळ पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामिण. रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.


याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी १६ मार्च रोजी तक्रारदार व त्यांचा भाऊ, पत्नी,दोन मुले यांचेविरुध्द मोहोळ पो. ठाणे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्हयात तक्रारदार यांचे पत्नी व दोन मुलास अटक न करण्यासाठी व गुन्हयात मदत व पुढे सहकार्य करण्यासाठी पोलीस नाईक होवाळ यांनी तक्रारदार गवळी यांचेकडे ६ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. 

No comments:

Post a Comment

Advertise