सांगली जिल्हय़ात सोमवारी कोरोनाचे नवे ६१ रुग्ण ; चौघांचा बळी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

सांगली जिल्हय़ात सोमवारी कोरोनाचे नवे ६१ रुग्ण ; चौघांचा बळी


सांगली जिल्हय़ात सोमवारी कोरोनाचे नवे ६१ रुग्ण ; चौघांचा बळी 
सांगली : काल सोमवार दिनांक २१ रोजी सांगली जिल्हय़ात कोरोनाचे नवीन 61 रूग्ण आढळून आले. तर चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात नवीन 31 तर ग्रामीण भागात 30 नवीन रूग्णांची भर पडली आहे. पलूस-बांबवडे, सांगली, आणि मिरज येथील चौघांचा बळी गेला आहे. एकूण बळी संख्या 37 झाली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात सोमवारी नवीन 31 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 22 सांगली शहरात, मिरज शहरात आठ आणि कुपवाड शहरात एक रूग्ण आढळून आला आहे. सांगली शहरात रेल्वेस्टेशन जवळील 55 वर्षीय व्यक्ती, गवळी गल्ली येथील 28 वर्षीय व्यक्ती, गणेशनगर येथील 40 वर्षीय व्यक्ती, हडको कॉलनीमध्ये एकाच घरातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये 70, 45, 36 वर्षाच्या महिला आणि 14 वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. संजयनगर जगदाळे प्लॉट येथील 35 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय व्यक्ती, पंचशीलनगर येथील माय-लेकाला कोरोनाची लागण झाली आहे. 28 वर्षीय महिला आणि दोन वर्षाचा बालक, खणभाग येथील 45 वर्षीय व्यक्ती, रमामाता नगर कुदळे प्लॉट येथील 30 वर्षीय व्यक्तीही बाधित आढळून आली आहे. मिरज शहरात बॉईज होस्टेल येथील 22 वर्षीय युवक, गर्व्हेमेंट मेडिकल कॉलेज येथील 32 वर्षीय महिला, वाळवे गल्ली येथील 58 वर्षीय व्यक्ती, अंबिकानगर येथील आठ वर्षाचा मुलगा, चंदनवाडी येथील 22 वर्षीय युवक, शिवाजी चौक येथील 19 वर्षीय युवक यांचा समावेश आहे. तर कुपवाड कापसे प्लॉट येथील 27 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आला आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मिरज शहरातील वाळवे गल्ली येथील 58 वर्षीय व्यक्ती आणि शिवाजी चौकातील 19 वर्षीय युवकाचा बळी गेला आहे. तर सांगली शहरातील खणभाग येथील 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने बळी गेला आहे. पलूस तालुक्यातील बांबवडे येथील 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या चौघांच्यावर मिरजेतील कोरोना रूग्णालय आणि भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने आतापर्यंत 37 जणांचे बळी गेले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise