आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ नवे रुग्ण : रूग्णामध्ये दोन नामांकित डॉक्टरसह, त्या पोलीस उपनिरीक्षक पत्नीचाही समावेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 29, 2020

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ नवे रुग्ण : रूग्णामध्ये दोन नामांकित डॉक्टरसह, त्या पोलीस उपनिरीक्षक पत्नीचाही समावेश


आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ नवे रुग्ण 
रूग्णामध्ये दोन नामांकित डॉक्टरसह, त्या पोलीस उपनिरीक्षक पत्नीचाही  समावेश 
माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोना चे ६ नवे रुग्ण आढळून आले असल्याने एकूण रुग्ण संख्या १३० झाली आहे. 

आज आलेल्या रूग्णामध्ये दिघंची येथील एक महिला एक पुरुष, मापटेमळा येथील एक महिला एक पुरुष, पात्रेवाडी येथील एक महिला तर आटपाडी शहरातील एका महिलेचा समावेश आहे.

दिघंची येथील त्या महिला पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कातील तिचा डॉक्टर पती व सून हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिघंचीमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे.

मापटेमळा येथील दोन पॉझिटिव्ह रूग्णामध्ये पहिल्या त्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील त्याची पत्नी व मुलगा यांचा रूग्णामध्ये समावेश आहे.

आटपाडी येथील पॉझिटिव्ह पोलीस उपनिरीक्षक च्या संपर्कातील त्याची पत्नी ही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तर पात्रेवाडी येथील ४४ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात आज अखेर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १३० झाली आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise