लॉकडाऊन काळात ५३२ सायबर गुन्हे दाखल; २७५ जणांना अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन काळात ५३२ सायबर गुन्हे दाखल; २७५ जणांना अटक


लॉकडाऊन काळात ५३२ सायबर गुन्हे दाखल; २७५ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५३२ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. १० जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-
■ व्हॉट्सॲप-  १९९ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स –  २२५ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १५ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६१ गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७५ आरोपींना अटक.
■  १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ९ वर.
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका व्यक्ती विरुद्ध बदनामीकारक राजकीय आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केली होती.

No comments:

Post a Comment

Advertise