राज्यात कोरोनाचे 4878 नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

राज्यात कोरोनाचे 4878 नवे रुग्ण

माणदेश एक्सप्रेस न्युज

राज्यात कोरोनाचे 4878 नवे रुग्ण
मुंबई : राज्यात मंगळवारी 4878 रुग्णांची वाढ झाली आहे, तर 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात 245 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या 48 तासात 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 150 रुग्णांचा मृत्यू हा मागील कालावधीतील आहे. राज्यात मृत्यूदर आता 4.49 इतका झाला आहे.
मंगळवारी राज्यात 1951 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 90,911 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 9,66,723 रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले, ज्यापैकी 1,74,761 रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,78,033 जण होम क्वांरटाईन आहेत तर 38,866 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 75,979 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ज्यांचावर उपचार सुरु आहे.
मंगळवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईतील 57, ठाणे मनपातील 15, भिवंडी 42, कल्याण-डोंबिवली 2, मीरा-भाईंदर 4, ठाणे 3, पालघर 5, पनवेल 7, सोलापूर 6, औरंगाबाद 4, पुणे 3, नाशिक 1 आणि जळगावमधील 1 रुग्णाचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Advertise