वाढदिवसाच्या बहाण्याने चौघांनी केला 44 वर्षीय महिलेवर बलात्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

वाढदिवसाच्या बहाण्याने चौघांनी केला 44 वर्षीय महिलेवर बलात्कार


वाढदिवसाच्या बहाण्याने चौघांनी केला 44 वर्षीय महिलेवर बलात्कार
मुंबई : चार नराधमांना एका 44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. मानखुर्द येथे 24 जून रोजी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.
मानखुर्द पोलिसांनी चारही नराधमांना अटक केली आहे. मात्र, या घटनेने मानखुर्दसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत. मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी धारावीतील लेबर कॅम्प येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याचा मित्र राज यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, असं खोटं सांगितलं होते. आरोपीनं पीडित महिलेला दुसरा आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतलं होतं. तिथं पीडित महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर अब्दुल शेख आणि रहीम शेख यांच्यासह चौघांनी महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. नंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडलं.

मात्र, दुसर्या दिवशी पीडित महिलेची गुंगी उतरल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिनं शरीराची तपासणी केली असता तिच्या सर्वांगावर ठिकठिकाणी ओरबडल्याच्या जखमा आढळून आल्या. आरोपींनी आपल्याला गुंगीचं औषध देऊन आपल्यावर सामुहिक बलात्कार केल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आलं. पीडित महिलेने 1 जुलै रोजी चारही आरोपीविरोधात मानखुर्द पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीची  गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चारही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise