लग्न समारंभाबाबत जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी 31 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जारी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 3, 2020

लग्न समारंभाबाबत जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी 31 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जारीलग्न समारंभाबाबत जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी 31 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जारी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/ हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पाडण्यास जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 23 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 23 जून 2020 रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 31 जुलै 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत करण्याबाबत आदेश जारी केले आहेत.
दिनांक 23 जूनच्या आदेशांमधील नमूद अटी व शर्तीचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Advertise