आटपाडी तालुक्यात आज ३ नवे कोरोना पॉझिटीव्ह ; दिघंची, पळसखेल, निंबवडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश ; एकूण रुग्ण ७९ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 17, 2020

आटपाडी तालुक्यात आज ३ नवे कोरोना पॉझिटीव्ह ; दिघंची, पळसखेल, निंबवडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश ; एकूण रुग्ण ७९


आटपाडी तालुक्यात आज ३ नवे कोरोना पॉझिटीव्ह
दिघंची, पळसखेल, निंबवडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश ; एकूण रुग्ण ७९ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे प्रमाण काही कमी होईना झाले आहे. काल दिनांक १६ रोजी १६ रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यामध्ये खळबळ माजली होती. 
आज नवीन आलेल्या रूग्णामध्ये तालुक्यातील दिघंची, पळसखेल व निंबवडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दिघंची येथील पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा इचलकरंजी येथून आलेला होता. सदर रुग्ण हा होम क्वारंनटाइन मध्ये होता. पळसखेल येथील पॉझिटीव्ह रुग्ण हा संस्था क्वारंनटाइन होता. तो. मुंबईहून आलेला होता. तर निंबवडे येथे आढळून आलेला पॉझिटीव्ह रुग्ण हा मुंबई (कळंबोली) येथून आलेला होता. त्याला ही ग्राम आपत्ती समितीने संस्था पॉझिटीव्ह क्वारंनटाइन करण्यात आलेला होता.
सदर ठिकाणी प्रशासनाने भेट देवून पहाणी केली असून नागरिकांनी भिती न बाळगता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे, हात स्वच्छ धुवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise