१६ जण कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 16, 2020

१६ जण कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर


१६ जण कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज १६ जण कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात तालुका चर्चेत आला असून तालुक्यात खळबळ माजली आहे.
आज नवीन रूग्णामध्ये नेलकरंजी येथे पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कामध्ये आलेल्या ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तळेवाडी येथील वृद्धाच्या संपर्कातील आलेल्या तिच्या मुलीला व दोनजण असे ३ जण, अर्जुनवाडी 2, शेटफळे येथील 2 जण व तडवळे येथील १ तर हिवतड येथील १ जण असे एकूण १६ जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.
कालच आटपाडी शहरामध्ये एकजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. तर आज तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये एकाच दिवशी १६ नवीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise