सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करा : मेजर सुभाष सासणे (निवृत्त) - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करा : मेजर सुभाष सासणे (निवृत्त)माणदेश एक्सप्रेस

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करा : मेजर सुभाष सासणे (निवृत्त)
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे / मुलींचे वसतिगृह आणि विश्रामगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पध्दतीने पहारेकरी, माळी, स्वयंपाकी, सफाई कामगार, सहाय्यक वसतिगृह अधिक्षक / अधिक्षिका इत्यादी पदे सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रासह दि. 15 जुलै 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे (निवृत्त) यांनी केले आहे.
निवडीचे व एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचा अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सांगली यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी 0233-2671711 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Advertise