आटपाडी तालुक्यात मका केंद्र सुरु करा ; हणमंतराव देशमुख यांची मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 7, 2020

आटपाडी तालुक्यात मका केंद्र सुरु करा ; हणमंतराव देशमुख यांची मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


आटपाडी तालुक्यात मका केंद्र सुरु करा 
हणमंतराव देशमुख यांची मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात शासनाच्या वतीने मका खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या आटपाडी तालुक्यात शेतकऱ्यांनी मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे. मागील वर्षी मक्याचा दर प्रती क्विंटल २००० ते २२०० रुपये होता. परंतु आता आटपाडी तालुक्यातील व्यापारी ११०० ते ११५० प्रती क्विंटल या दराने मका विकत घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे. तरी शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र सुरु करून रब्बी व खरीप हंगामातील शेतकऱ्यांची मका खरेदी करणेत यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise