Type Here to Get Search Results !

स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न


स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून  दिनांक ०१ जून ते ०६ जून २०२० या कालावधीमध्ये ‘रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर’ या विषयावर ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न झाला.
जगभरातील वस्तू निर्माण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे गरजेचे असते. येत्या दशकामध्ये वस्तू निर्माण क्षेत्रातील प्रगतीसाठी व त्यामधील संशोधन आणि उपलब्ध संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा विनाशुल्क आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये देशभरातून तब्बल १३ राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील एकूण ८३० जणांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहित करत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख कार्यरत असतात. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ. दिनेशसिंह ठाकूर, असोसिएट प्रोफेसर, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज पुणे यांनी इंडस्ट्री ४.० आणि प्रॉडक्ट डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग क्लाउड कॉम्प्यूटिंग नेटवर्क या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी ‘अपॉर्च्युनीटी अँड चॅलेंजेस इन फोटोकेमिकल मशीनिंग’ या संदर्भात संवाद साधला. तिसऱ्या दिवशी डॉ. विशाल प्रभाकर धमगयी, रुदरफोर्ड इंटरनॅशनल मॅरी क्यूरी फेलो डायमंड लाईट सोर्स अप्लिटन लॅबोरेटरी दिडकोट ऑक्सफर्ड यु.के.अँड सायंटिफिक ऑफिसर राजा रामन्ना सेंटर फॉर ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी, इंदोर मध्यप्रदेश यांनी ‘मायक्रो-नॅनो फॅब्रिकेशन एक्स रे लिथोग्राफी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी डॉ.सुहास देशमुख, असोसिएट प्रोफेसर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड यांनी ‘थ्री डी मायक्रो फॅब्रिकेशन अँड कॅराक्टरायझेशन टूल्स’ या विषयावर संवाद साधला. कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी प्रा.प्रमोदकुमार पटवारी,  प्रोफेसर अँड डीन फॅकल्टी वेल्फेअर एनआयटी सिल्चर, आसाम यांनी ‘ऐम इन मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयी मार्गदर्शन केले तर शेवटच्या दिवशी डॉ. ईश्वर कृष्णा, असिस्टंट प्रोफेसर अमिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमिटी युनिव्हर्सिटी, नोएडा, उत्तर प्रदेश यांनी ‘इलेक्ट्रिक डिस्चार्ज कोटिंग प्रोसेस’ बद्दल माहिती दिली. 
सदर ऑनलाईन कार्यशाळा ही प्रत्येक दिवशी दोन तास गुगल मीट ॲप द्वारे व फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आली. त्याचबरोबर सहभागींकडून प्रत्येक सत्राच्या संबंधित ऑनलाईन प्रश्नावली देखील सोडवण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये सहभागी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कोरोना सारख्या बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत अनुभवी मान्यवरांमार्फत अतिशय मौल्यवान मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये प्रभाकरराव काकटिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स, वारंगल तेलंगणा, रायप्पा महाले, रेवा यूनिवर्सिटी बेंगलोर, कर्नाटक, डॉ.एन.तिरुवेंद्र कदम, के.एस.रंगास्वामी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, तिरूचेंगोडे तामिळनाडू आदींनी आपले अभिप्राय व्यक्त केले. ही ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे निमंत्रक व मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.दिग्विजय रोंगे, प्रा.श्रीकृष्ण भोसले, प्रा.दिगंबर काशीद, प्रा.अविनाश पारखे यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले तर तांत्रिक व्यवस्थापन  प्रा.सचिन भोसले, बालाजी सुरवसे व प्रा.कपिल जुंदळे यांनी पाहिले. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies