गांजा तस्करी प्रकरणात मंगळवेढ्यातील तरुणास अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 28, 2020

गांजा तस्करी प्रकरणात मंगळवेढ्यातील तरुणास अटक


गांजा तस्करी प्रकरणात मंगळवेढ्यातील तरुणास अटक
माणदेश एक्सप्रेस न्युज
 मंगळवेढा/प्रतिनिधी :  शेंडा पार्कात जप्त करण्यात आलेल्या 20 किलो गांजामागे असलेले  उस्मानाबाद कनेक्शन राजारामपुरी पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात आणखी चौघांना अटक करण्यात आली असून दीड किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती शहर उपअधीक्षक डॉ. प्रेरणा कट्टे यांनी दिली. संशयितांना 5 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळकृष्ण तानाजी नागणे (वय 28, रा. मंगळवेढा, सोलापूर), राहुल शिवाजी देवमारे (वय 27), संतोष पुंडलिक काळे (वय 44, रा. दोघे रा. पंढरपूर, सोलापूर), शेषेराव सीताराम जाधव (वय 42, रा. आष्टा, उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
राजारामपुरी पोलिसांनी 19 जूनला शेंडा पार्क येथे छापा टाकून विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त केला होता. हा गांजा संशयित धनंजय शिंदे (रा. विटा, खानापूर) व वैभव पाटील (वय 32, रा. उजळाईवाडी, करवीर) या दोघांच्या ताब्यात मिळून आल्याने दोघेही अटकेत आहेत. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात गांजा सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून आणल्याचे समोर आले. यावरून शुक्रवारी बाळकृष्ण, राहुल, संतोष, शेषेराव यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या वैभवकडून 1 किलो गांजा जप्त केला, तर संतोषकडे अर्धा किलो गांजा मिळून आला. या कारवाईत उपनिरीक्षक अभिजित गुरव, कर्मचारी आनंद निगडे, प्रकाश पारधी, सुभाष चौगुले, प्रवीण पाटील, विशाल खराडे, रोहित पवार, प्रशांत पाथरे, रवी आंबेकर, सिद्धेश्वर केदार, महेश पाटील, तानाजी दावणे यांनी सहभाग घेतला.

गांजाचे व्यसन जडलेला इंजिनिअर विक्रेता
पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित वैभव पाटील हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याचे वडीलही डॉक्टर आहेत. तो सुरुवातीला गांजाची नशा करीत होता. गांजाच्या आहारी गेलेला वैभव यातूनच गांजा विक्रेता बनल्याचा माहिती उपअधीक्षक कट्टे यांनी दिली, तसेच या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल तपास करून पाळेमुळे खणून काढणार असल्याचे कट्टे म्हणाल्या.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस  

No comments:

Post a Comment

Advertise