Type Here to Get Search Results !

विटा नगरपरिषदेचा दुकानांवर धडक कारवाईचा बडगा ; मुख्याधिकारी अतुल पाटील : कोरोना संकटाला गांभिर्याने घ्या ; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई


विटा नगरपरिषदेचा दुकानांवर धडक कारवाईचा बडगा
मुख्याधिकारी अतुल पाटील : कोरोना संकटाला गांभिर्याने घ्या ; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : विटा नगरपरिषदेकडून शहरांमध्ये कोरोना संकटात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या पालिका पथकाद्वारे शहरात कारवाई करण्यात आली.  शासनाने दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने उघडी ठेवण्यात आली असल्याचे व सदर दुकानातील मालक, कामगार हे मास्क वापरत नसल्याचे आढळून आल्याने सदर दुकानांना आर्थिक दंड करण्यात करण्यात आला असल्याने या दंडात्मक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी अतुल पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत व सर्व वॉर्ड ऑफीसर यांच्या पथकाद्वारे अचानक धाडी टाकून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी वार्डनिहाय होम क्वारंनटाईन असलेल्या लोकांना भेटी देऊन कडक सुचना दिलेल्या आहेत. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले की, शहरातील मेडिकल, दवाखाने, वगळता इतर दुकानांनी, व्यावसायिकांनी शासनाने पारित केलेल्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेनुसार आपला व्यवसाय करावा. जर शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच मास्क, सॅनिटायझर चा वापर  करावा,  शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन काटेकोरपणे करावे, विटा शहराच्या जवळपास अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असताना आपण जास्तीतजास्त खबरदारी घ्यावी. अन्यथा कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येवू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies