Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : आ. पडळकर


उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : आ. पडळकर
पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान द्या असे पडळकर म्हणाले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.
सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात बाहेरील व्यक्ती, महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, असं गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेत म्हणाले. सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबाला विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा मान द्यावा, असा आग्रह पडळकर यांनी धरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies