जागतिक पर्यावरण दिनी "वसुंधरा" संस्थेतर्फे खानापूर येथे वृक्षलागवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, June 5, 2020

जागतिक पर्यावरण दिनी "वसुंधरा" संस्थेतर्फे खानापूर येथे वृक्षलागवड


जागतिक पर्यावरण दिनी "वसुंधरा" संस्थेतर्फे खानापूर येथे वृक्षलागवड
 माणदेश एक्सप्रेस न्युज
खानापूर/वार्ताहर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पारित केलेल्या लॉकडाउनच्या नियमाचे पालन करून 5 जून जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खानापूर यांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने वृक्षलागवडीचा स्तुत्य उपक्रम खानापूर पोसेवाडी परिसरातील तलावाच्या कडेला विविध प्रकारची झाडे लावत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत लावलेल्या झाडांना जाळीचे कंपाऊंड केले. वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असून याच उद्देशाने संस्थेने वृक्षारोपणाचा उपक्रम करून पर्यावरण रक्षण केले आहे.
यावेळी वसुंधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, सचिव नितीन चंदनशिवे, खजिनदार भगवान जाधव, उपाध्यक्ष गणेश धेंडे, खानापूर तालुका समन्वयक नानासाहेब मंडलिक, सदस्य असलम शेख, रोहीत पवार, केदार जावीर, प्रतीक्षा जाधव ऋग्वेद शिंदे यांच्यासह संस्थेतील सर्व पदाधिकारी व पर्यावरण मित्र यांनी  वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

No comments:

Post a Comment

Advertise