Type Here to Get Search Results !

आजचा दिनांक १४ जुन वाढदिवस : मंत्री आदित्य ठाकरे


आजचा दिनांक १४ जुन वाढदिवस : मंत्री आदित्य ठाकरे
आटपाडी : राज्याचे  पर्यावरणमंत्री, पर्यटन आणि राजशिष्टाचारा मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव व रश्मी ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेल्या आदित्य यांचे शिक्षण माहीम येथील बॉम्बे स्कॉस्टिश स्कूलमधून झाले. त्यांनी सेंड झेवियर कॉलेजमधून बीएची पदवी घेतली आणि के. सी. लॉ कॉलेजजमधून त्यांनी एएएलबी पूर्ण केले. 
ते कवी आणि गीतकारही आहेत. वडिलांप्रमाणे त्यांनाही छायाचित्रणाची हौस आहे. आदित्य यांचे पहिले आंदोलन म्हणजे शिवसेनेची बदनामी करणाऱ्या पुस्तकाविरोधात होते. रोहिंटन मिस्त्री यांनी `सच अ लॉंग जर्नी`या शिवसेनेची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचा समावेश मुंबई विद्यापीठाने त्यांच्या यादीत केला होता. त्याविरोधात हे आंदोलन झाले. निवडणूक लढणारे आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. मंत्री होणारे दुसरे. कारण त्यांच्या आधी त्यांचे वडिल हे मुख्यमंत्री झाले होते. वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लढवली. युवा सेनाप्रमुख म्हणून त्यांची 2010 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे ते अध्यक्ष झाले. 2020 मध्ये ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies