सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण ; जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४६ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, June 6, 2020

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण ; जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४६


सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण ; जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४६ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात आज कोरोना बाधित तीन नवे रुग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यातील नेर्ली, वाळवा तालुक्यातील वाटेगाव व पलूस तालुक्यातील पलूस शहरात हे रुग्ण सापडल्याने सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1४६ झाली आहे.
जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नव्हता. परंतु आज सापडलेला कोरोना रूग्णामुळे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना हा संसर्गजन्य विषाणू पोहचला आहे. आज सापडलेल्या रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १४६ झाली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise