Type Here to Get Search Results !

मंगळवेढ्याचा आठवडा बाजार हळूहळू पूर्ववत






मंगळवेढ्याचा आठवडा बाजार हळूहळू पूर्ववत 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/नारायण माने : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व संचारबंदीमुळे बंद असलेला मंगळवेढ्यातील शिवप्रेमी चौकातील, दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार, आज 15 जून 20 रोजी त्याच ठिकाणी रिकाम्या शेडमध्ये, सोशल डिस्टस्निंग पाळून, पालेभाज्या व फळे विक्रीत्यांना बसवून बाजार भरलेला दिसून आला.
 अडीच महिने झाले, येथील रिकामी असणारी जागा माणसाने गर्दीने भरून आलेली दिसली. सध्या पावसाळ्याच्या दिवसाचा विचार करता, नगरपालिकेचा आठवडा बाजार कट्ट्यावर पालेभाज्या व फळे विक्रीत्याची व्यवस्था केल्यास, माल सुरक्षित राहून विक्री होईल त्या दृष्टीने नगरपालिकेने विचार करावा, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत होती. त्याची दखल घेऊन नगरपालिकेकडून आजचा बाजार भरविल्याचे दिसून आले.
   नियमाचे पालन करावे 
आठवडा बाजार ठिकाणी व्यवसायिकांना बसण्यास कट्टे व पत्रा शेड ची सोय असल्याने पावसापासून संरक्षक होत आहे. नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता मास्क व सुरक्षित अंतर नियमाचे पालन करून पालेभाज्या व खरेदी करावी. फळे व भाजी विक्रेत्यांनीही मास्क,  हॅण्डक्लोज, सॅनिटायझर वापरावेत. ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
   कु. पल्लवी पाटील
मुख्याधिकारी, मंगळवेढा नगरपालिका
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies