लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही ; सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री “या” राज्याचे ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहा कितव्या स्थानी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, June 2, 2020

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही ; सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री “या” राज्याचे ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहा कितव्या स्थानी


लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री “या” राज्याचे ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहा कितव्या स्थानी 
मुंबई :  सी व्होटर संस्थेनं देशातील नेत्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असून लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ५ व्या स्थानी पसंती मिळालेली आहे.
सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता जवळपास ८३ टक्के इतके आहेत. त्यांच्यानंतर छत्तीसगडचे भूपेश बघेल (८१ टक्के), केरळचे पिनरायी विजयन (८० टक्के), आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (७८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी (७६ टक्के) आहेत. तर  अरविंद केजरीवाल यांचा सहावा क्रमांक असून त्यांची लोकप्रियता ७४ टक्के इतकी आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise