वडिलांनी दारुड्या मुलाला डोक्यात फरशी मारून केले गंभीर जखमी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, June 15, 2020

वडिलांनी दारुड्या मुलाला डोक्यात फरशी मारून केले गंभीर जखमी

वडिलांनी दारुड्या मुलाला डोक्यात फरशी मारून केले  गंभीर जखमी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे दि. १४ मध्यरात्री वयोवृद्ध वडिलांनी दारुड्या मुलाला डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. संतोष शंकर शिंदे वय ३५ असे जखमीचे नाव आहे. शंकर रामचंद्र शिंदे वय ७६ असे आरोपीचे नाव आहे. घटनेची फिर्याद जखमीचा भाऊ दीपक शंकर शिंदे यांनी चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष शिंदे हा रविवारी मध्यरात्री दारू पिऊन घर व जमिनीची वाटणी द्यावी म्हणून आई-वडिलांना शिवीगाळ करीत होता. यावर आरोपी शंकर शिंदे यांनी तुला काय करायचे ते कर, असे मुलाला सांगितले. यावर संतोष याने तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. माझ्या वाटणीची जमीन मला द्या, नाही तर तुम्हाला मारून टाकीन, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. रोजच्या त्रासाला कंटाळून, रागाच्या भरात शंकर शिंदे यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने संतोष याच्या डोक्यात फारशी मारून गंभीर जखमी केले. संतोष हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.No comments:

Post a Comment

Advertise