गुजरातचा मृत्यूदर सांगा : मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे भाजपला खडे बोल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, June 15, 2020

गुजरातचा मृत्यूदर सांगा : मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे भाजपला खडे बोल


गुजरातचा मृत्यूदर सांगा : मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे भाजपला खडे बोल
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई :  गुजरातमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सांगा असे सांगत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला खडे बोल सुनवले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे, असे माध्यमातून सांगण्यात येत असल्यामुळे ते चांगलेच संतापले. राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी एक लाखावर गेली असली तरी त्यातील ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत. हे सांगितले जात नसून हा साधा चावटपणा नाही तर भलामोठा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. 


जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यामातून ट्विट करत म्हणाले, "महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की!" असे आवाहनच त्यांनी भाजपला दिले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस
No comments:

Post a Comment

Advertise