सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हे तर प्लॅन मर्डर असल्याचा अभिनेत्रीचा बॉलिवूडवर आरोप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, June 16, 2020

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हे तर प्लॅन मर्डर असल्याचा अभिनेत्रीचा बॉलिवूडवर आरोप

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हे तर प्लॅन मर्डर असल्याचा अभिनेत्रीचा बॉलिवूडवर आरोप
मुंबई :  सुशांत सिंह राजपूतने गळफास घेवून आत्महत्या केली. ती आत्महत्या नसून त्याचा तर प्लॅन मर्डर असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूडवर केला आहे. 
कंगना राणावत सुशांतच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाली, सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झाला आहे. काही जण सुशांत कमकुवत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, तो मानसिकदृष्ट्या कमकुवत कसा असू शकतो? आत्महत्येआधी सुशांतची जी परिस्थिती होती, त्यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे. सुशांतवर बोट दाखवणाऱ्या सर्वांचाच कंगनाने चांगलाच समाचार घेतला आहे.याबाबत कंगना राणावत हिचा गंभीर आरोप असलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. इंडस्ट्री मला स्वीकारत नाहीय. माझा कुणी गॉडफादर नाही, माझे सिनेमा बघा, नाहीतर मी या इंडिस्ट्रीतून बाहेर फेकला जाईन. सुशांतने अनेक चांगले सिनेमे केले होते. सुशांतच्या पहिल्या सिनेमाला (काय पो छे) फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी एवढं महत्त्व नाही दिलं. त्यानंतर 'एमस धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे' या सिनेमातील सुशांतच्या कामाबद्दल त्याचं एवढं कौतुक झालं नाही, जेवढं व्हायला हवं होतं. एवढे चांगले सिनेमे करुन देखील त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. दुसरीकडे 'गली बॉय'सारख्या फालतू सिनेमाला एवढे पुरस्कार मिळाले.
सुशांतला या फिल्म इंडिस्ट्रीमधील लोकांनी त्याच्या सात वर्षाच्या कारकिर्दित एवढी इज्जत नाही दिली, जेवढा त्याचा हक्क होता. मला अनेक मेसेज येतात, तू देखील कठीण काळातून जात आहेत, चुकीचं पाऊल उचलू नकोस. मात्र अशा आशयाच्या मेसेजचा अर्थ नेमका काय काढायचा. का माझ्या डोक्यात आत्महत्येसारख्या गोष्टी टाकल्या जातात. 
सुशांतची चूक ही होती की त्याने या लोकांचं म्हणणं ऐकलं. या लोकांना इतिहास लिहायचा आहे, त्यांना हेच सिद्ध करायचं आहे की सुशांत मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. मात्र खरं काय आहे, हे इंडस्ट्रीतील मंडळी सांगणार नाही.

No comments:

Post a Comment

Advertise