स्टेज डान्सर ते धोनी ; सुशांत सिंग राजपूतच्या बॉलिवूड मधील यशस्वी प्रवास - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 14, 2020

स्टेज डान्सर ते धोनी ; सुशांत सिंग राजपूतच्या बॉलिवूड मधील यशस्वी प्रवास

स्टेज डान्सर ते धोनी ; सुशांत सिंग राजपूतच्या बॉलिवूड मधील यशस्वी प्रवास
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : स्टेज डान्सर ते धोनी असा सुशांत सिंग राजपूतच्या बॉलिवूड मधील यशस्वी प्रवास आहे. “काई पो छे” या सिनेमामधून त्याचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. परंतु त्याला खरी ओळख ही २०१६ आलेल्या भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी चा बायोपिक एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून या सिनेमाद्वारे मिळाली. 
सुशांत सिंग राजपूतने त्याच्या करियरची सुरूवात स्टेज  डान्सरपासून केली. 2008 साली स्टार प्लस वाहिनीवरील मालिका किस देश में है मेरा दिलमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. 2010 साली तो टेलिव्हिजनवरील रिएलिटी शो जरा नचके दिखामध्ये झळकला होता. त्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली ती एकता कपूरची मालिका पवित्र रिश्तामधून. या मालिकेतील भूमिकेतून तो घराघरात पोहचला. छोट्या पडद्यावर यशस्वी वाटचाल केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडकडे वळला. 
2013 साली त्याने काय पोछे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच सालात त्याचा आणखीन एक सिनेमा रिलीज झाला. हा चित्रपट म्हणजे शुद्ध देसी रोमांस. 2014 साली तो आमीर खानचा सुपरहिट सिनेमा पीकेमध्ये अनुष्का शर्माच्या प्रियकराच्या भूमिकेत झळकला होता. 2015 साली सुशांत डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. सुशांतला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली 2016 साली रिलीज झालेला बायोपिक एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी सिनेमातून. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती आणि या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. त्यानंतर त्याने राबता, वेलकम टू न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिडिया व छिछोरे या सिनेमात काम केले होते.
सुशांतला आतापर्यंतच्या त्याला बरेच पुरस्कारही मिळाले होते. इंडियन टेलिव्हिडन अॅकाडमीचा पुरस्कार, बिग स्टार एण्टरटेन्मेंट अवॉर्ड, कलाकार अवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.


No comments:

Post a Comment

Advertise