आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले : आरोग्यमंत्री राजेश टोपे ; राज्यात कोरोनाच्या ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, June 2, 2020

आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले : आरोग्यमंत्री राजेश टोपे ; राज्यात कोरोनाच्या ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू


आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले
आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्यात कोरोनाच्या  ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यात आज १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:  ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २४६५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड -३, सांगली ३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि  अहमदनगर -१ असे आहेत.No comments:

Post a Comment

Advertise