सांगली जिल्हा केमिस्टच्या वतीने आटपाडी तालुक्यातील केमिस्ट यांना हॅन्ड ग्लोज, मास्क, होमिओपॅथिक गोळ्याचे वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, June 8, 2020

सांगली जिल्हा केमिस्टच्या वतीने आटपाडी तालुक्यातील केमिस्ट यांना हॅन्ड ग्लोज, मास्क, होमिओपॅथिक गोळ्याचे वाटपसांगली जिल्हा केमिस्टच्या वतीने आटपाडी तालुक्यातील केमिस्ट यांना हॅन्ड ग्लोज, मास्क, होमिओपॅथिक गोळ्याचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज  
आटपाडी/बिपीन देशपांडे : दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केमिस्ट व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी सोशल डिस्टन्स चे नियम पाळत सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा केमिस्ट यांच्यावतीने हॅन्ड ग्लोज, मास्क, होमिओपॅथिक गोळ्याचे आटपाडी शहरासह तालुक्यातील सर्व केमिस्टना मोफत वाटप करण्यात आले.
संकटात मनोबल वाढावे व उत्साह निर्माण व्हावा ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांनी पुढाकार घेवून वाटप करण्यात आले. यावेळी संचालक जिल्हा उपाध्यक्ष शिवराज देशमुख, तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील, गौरीहर पवार को-चेअरमन सांगली जिल्हा, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, सभासद प्रताप जाधव, अजित गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise