Type Here to Get Search Results !

रश्मी ठाकरे यांना पितृशोक ; वडील माधव पाटणकर यांचे निधन : मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला





रश्मी ठाकरे यांना पितृशोक ; वडील माधव पाटणकर यांचे निधन : मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला असून पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. 


माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली," असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies