Type Here to Get Search Results !

आजचा वाढदिवस : राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख व युवकांच्या गळ्यातील ताईत


आजचा वाढदिवस : राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख व युवकांच्या गळ्यातील ताईत 
राज ठाकरे हे प्रसिद्ध संगीतकर श्रीकांत ठाकरे यांचे पुत्र, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते चुलतबंधू आहेत. 
राज ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण दादर मधील बालमोहन विद्यालयात पूर्ण झाले. त्यांचे संपूर्ण बालपण दादर येथेच गेले. राज ठाकरे हे स्वतः उत्तम व्यंग्यचित्रकार आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. आपली मते ते स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या सगळ्याच सभा प्रचंड गर्दी खेचणाऱ्या असतात. ते स्वतः साहित्य, कला, संगीत यांचे उत्तम जाणकार आहेत. 
आपली राजकीय कारकिर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना अशा जबाबदाऱ्या त्यांनी शिवसेनेत मोठ्या आक्रमकपणे सांभाळल्या. याच काळात शिव उद्योग सेनेसाठी मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम त्यांनी मुंबईत आयोजित केला होता. तो गाजला आणि त्यावर टिकाही झाली होती. 
शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे सांगत जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना सोडली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी मुंबईत व राज्यात येणाऱ्या परप्रांतिय व विशेषतः बिहार व उत्तर प्रदेशच्या लोकांना टिकेचे लक्ष्य केले. त्यामुळे राज व त्यांची मनसे यावर कायमच टिका होत राहिली.  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. तर नाशिक महापालिकेवरही सत्ता आणण्यात मनसेला यश आले. 
२०१९ च्या निवडणुकांत राज यांचा “लाव रो तो व्हिडीओ” हा डायलॉग खूप गाजला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्या धोरणांवर आपल्या सभांमधून खुली टिका केली. त्याचा फायदा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला मिळाला. अशा या युवकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या नेत्याचा आज वाढदिवस. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies