Type Here to Get Search Results !

सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत करा ; आटपाडी तालुका व शहर नाभिक संघटनेची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी


सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत करा
आटपाडी तालुका व शहर नाभिक संघटनेची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून सलून व्यवसाय ठप्प असल्याने सलून व्यवसायिक अडचणीत आले आहेत. शासनाने सलून व्यवसायिकांचे सर्व कर माफ करावेत अशी मागणी आटपाडी तालुका व शहर नाभिक महामंडळाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 
कोरोनाशी लढाई सुरू असतानाच देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा सलून व्यवसायावर संक्रांत आली. अडीच महिन्याच्या कालावधीनंतर योग्य ती खबरदारी घेऊन व्यवसाय सुरू झाले. हळूहळू निर्बंध शिथिल करत जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच एक जून मध्ये शासनाने सलून व्यवसाय सुरू करण्यास स्थगिती दिली. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सलून व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. त्यातच कुटुंबाची उपजीविकेचे जबाबदारी, दुकान भाडे, विजबिल, कर्जाचे हप्ते या सर्वांमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सलून व्यवसायिक पूर्णपणे कोलमडून गेला आहे, एकीकडे बंद असलेले अनेक उद्योग व्यवसाय सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली, तालुक्याच्या ठिकाणी नाभिक समाज मोठ्या संख्येने आहे, या व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन सलून व्यवसाय, कारागीर यांची कोलमडलेले जीवन पूर्ववत करण्यासाठी सहा महिन्यांचे वीजबिल, एक वर्षाचे दुकान भाडे, विविध महामंडळ, बँकांकडून व्यवसायासाठी घेतलेली कर्ज माफ करावे इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies