कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या : आटपाडी तालुक्यातील घटना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, June 6, 2020

कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या : आटपाडी तालुक्यातील घटना


कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या : आटपाडी तालुक्यातील घटना
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोनाच्या भीतीने दिगंबर कृष्णा खंडेकर (वय 68) वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घडली आहे.  शेटफळे येथे सापडलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णाच्या घरालगतच्या या ज्येष्ठ व्यक्तीचे घर आहे.
शेटफळे येथील एकाच घरातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याच घराच्या शेजारी दिगंबर कृष्णा खांडेकर ( व्य ६८ वर्ष) यांचे घर आहे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांच्या स्वबचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये मयत दिगंबर कृष्ण खांडेकर याच्या भावाचा मुलगा समावेश असल्याने ते बैचन झाले होते. त्यातच ते मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्याने मुलाला आणि पत्नीला आपल्याकडे कोरोना झाला असल्याचे सतत सांगत होते. गावातील दक्षता समितीचे सदस्य विजय देवकर यांनी आरोग्य सेवक चवरे यांना बोलावून त्यांची तपासणी केली होती. परंतु काल मध्यरात्री त्यांनी घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि शेवविच्छेदनासाठी शेव आटपाडीला हलवले. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise