Type Here to Get Search Results !

आटपाडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी




आटपाडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यात आटपाडी हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पॉझीटीव्ह केस दिनांक 18 मे 2020 रोजी निदर्शनास आली होती. तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. सदर झोनचे 28 दिवस दिनांक 15 जून 2020 रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यात आटपाडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 15 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक 16 जून 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies