पडळकरांना दुचाकीवरुन फिरवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 28, 2020

पडळकरांना दुचाकीवरुन फिरवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी


पडळकरांना दुचाकीवरुन फिरवणाऱ्या  राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना दुचाकीवर फिरवणाऱ्या जत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. पडळकरांना राज्यात फिरु देणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं. जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी स्वत:च्या दुचाकीवर पडळकरांना बसवून, शहरभर फिरवून, राष्ट्रवादीला एक प्रकारे खिजविले होते. याशिवाय गोपीचंद पडळकर यांचा हारतुरे घालून सत्कारही केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Advertise