आटपाडीत आम. गोपीचंद पडळकरांच्या फोटोला दुग्धभिषेक ; समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 28, 2020

आटपाडीत आम. गोपीचंद पडळकरांच्या फोटोला दुग्धभिषेक ; समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी


आटपाडीत आम. गोपीचंद पडळकरांच्या फोटोला दुग्धभिषेक ; समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्याकडून दुधाचा अभिषेक घातला गेला व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले, शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे,. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर पडळकरां विरोधात आंदोलन केलं. या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिक-ठिकाणी आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले  होत. तर त्यांच्या समर्थकाकडून मात्र त्यांच्या फोटोला ठिकठिकाणी दुधाचा अभिषेक घालण्यात येत आहेत. त्यामुळे आटपाडी येथील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालण्यात आला व त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य तानाजी (मामा) यमगर, आटपाडी बाजार समितीचे संचालक विष्णू अर्जुन, युवा नेते जयवंत सरगर, जेष्ठ नेते हरी (शेठ) गायकवाड, प्रभाकर पुजारी, आटपाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर, बिरुदेव खांडेकर, उमाजी सरगर यांच्यासह मोठ्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Advertise