Type Here to Get Search Results !

मनसेचे, युवक-युवतींना नोकऱ्या व रोजगाराचे आमिष




मनसेचे, युवक-युवतींना नोकऱ्या व रोजगाराचे आमिष 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे शाखा डोंबिवली यांच्यावतीने महाराष्ट्रातील मराठी भाषिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मुंबईमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एमएनएसरोजगारडॉटकॉम वेबसाइटच्या माध्यमातून काम काम सुरू केले आहे. मनसे आमदार राजू पाटील आणि कल्याण ग्रामीण मनसे अध्यक्ष मनोज घरत यांच्या संकल्पनेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वेबसाइटचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे पाठीमागील तीन महिन्यापासून मुंबई शहरातील व्यवसाय, उद्योगधंदे, लघुउद्योग, शासकीय व निमशासकीय कार्यालये पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार व नोकरीच्या निमित्ताने मुंबई नगरीत येऊन स्थायी झालेल्या लाखो व्यक्तींना कोरोनाच्या भीतीने व त्याच्या नियंत्रणासाठी सुरु असलेल्या लोकडाऊन मुळे नोकरी, व्यवसाय व उद्योग सोडून आपापल्या मूळ गावी जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे अनेक महाराष्ट्रीयन व परप्रांतीय लोक कोणाच्या भेटीने आपली कामे सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे आता मुंबईमधील उद्योग व व्यवसाय कामगाराच्या अभावामुळे अडचणीत आले आहेत. हे उद्योग व व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू करायचे असतील तर त्यासाठी पूर्वीप्रमाणेच मनुष्यबळ गरजेचं आहे मात्र परप्रांतीय लोक परत मुंबई मध्ये येण्याची शक्यता कमी आहे. याच संधीचा फायदा पिढ्यानपिढ्या परप्रांतीयांच्या विरोधात आक्रोश करणार्या  मनसेला सापडला आहे. परप्रांतीय मजूर व कामगारांना मुंबईतून हाकलून देण्यासाठी अनेक वेळा मनसेने आंदोलने केलेली आहेत, पण त्यांना यश आले नव्हते. कोरोनाच्या आगमनामुळे ही संधी त्यांना आयती चालून आली, म्हणजे “सुंटेविना खोकला गेल्यासारखे झाले” खरे तर परप्रांतीयांना मुंबईतून हाकलून देण्याचा मुद्दा मनसेने राजकारणासाठीच बाहेर काढला होता, पण त्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. नंतरच्या काळात त्यांनी राजकारणामध्ये अपयश आल्यानंतर आपल्या पक्षाचा झेंडा बदलून त्याला हिंदुत्वाचा रंग दिला व त्याचबरोबर त्यांनी आपली विचारधारा हिंदुत्वाकडे वळवली आहे. पण एवढं सगळं करूनही त्यांना आपल्या भविष्यकालीन राजकीय अस्तित्वाविषयी खात्री नसल्यामुळे पुन्हा त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्र व मराठी वर चे प्रेम पुन्हा उफाळून आले आहे. 



मुंबईमधील परप्रांतीय कामगार मायदेशी निघून गेल्यामुळे आता त्यांच्या जागेवर महाराष्ट्रातील आणि शुद्ध मराठी भाषा बोलणारे तरुण-तरुणी यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मनसे धडपडत आहे. त्यासाठीच त्यांनी सदर वेबसाईट सुरू केलेली आहे. मात्र याठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणाऱ्या युवकांना मुंबईमध्ये नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणारी मनसे कोण आहे? या संघटनेला तरुणांना नोकरी देण्याचे काय अधिकार आहेत काय? महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे का? यांच्या मालकीचे मुंबईत किती उद्योगधंदे, व्यवसाय व कंपन्या सुरू आहेत, की ज्यामध्ये ते स्वतः महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील? त्यांनी मुंबईत नोकऱ्या लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट सरकार कडून घेतले आहे काय? त्यांचे एखादे निवड मंडळ आहे काय, की जे महाराष्ट्रातील युवकांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देऊ शकते? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतानाही मग मनसे महाराष्ट्रातील मराठी भाषिक युवकांना नोकरी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेबसाईट सुरू का करत आहे? हा प्रश्न निर्माण होतो. या गोष्टीचा सारासार विचार केला तर लक्षात येते की मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र मनसे पक्ष स्थापन केला व या पक्षाच्या माध्यमातून विधानसभेच्या १३ जागा निवडून आणल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपले थोडेफार अस्तित्व निर्माण केले होते. त्यावेळेस त्यांनी बहुजन हिताची भूमिका घेतली होती. त्यांच्या पक्षाचा झेंडा आहे अनेक रंगाचा होता. मात्र नंतरच्या काळात या पक्षाला अपेक्षित यश न आल्यामुळे काही दिवसापूर्वी त्यांनी आपला रंगीबेरंगी झेंडा सोडून दिला व भगव्या झेंड्याचा आसरा घेतला आहे. एवढच नाही तर बहुजनवादी विचारधारा बदलून हिंदुत्ववादी विचारधारेचा स्वीकार केला आहे. याच गोष्टींना पूरक म्हणून की काय आता महाराष्ट्रातील तरुण युवकांना व युवतींना आपल्या पक्षाकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांना या नोकऱ्या व रोजगाराचे आमिष दाखवंत आपल्या पक्षाकडे आकर्षित करून घेण्याचा अल्प प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies