Type Here to Get Search Results !

स्थानिक राजकारण विसरून राज्यातील समस्या सोडविण्यासाठी विधानपरिषदेत आवाज उठवणार : आमदार गोपीचंद पडळकर


स्थानिक राजकारण विसरून राज्यातील समस्या सोडविण्यासाठी विधानपरिषदेत आवाज उठवणार : आमदार गोपीचंद पडळकर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गेली 15 वर्ष मतदार संघात संघर्ष करावा लागला. परंतु स्थानिक राजकारण विसरून आता राज्यातील निर्माण झालेल्या समस्या मांडण्यासाठी विधानपरिषदेत आवाज उठवणार आहे. आम्ही सत्तेत नसलो तरीही मतदार संघातील आणि राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पराकाष्टा करणार आहे. ते प्रश्न निश्चित सुटतील आणि विकास कामे उभे राहतील याचा पूर्ण विश्वास असल्याचे मत विधान परिषदेचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 
आटपाडीत पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्याचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, पंचायत समितीच्या सभापती डॉ. भुमिका बेरगळ, उपसभापती रुपेशकुमार पाटील, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विष्णूपंत अर्जुन, प्रभाकर पुजारी, पंचायत समिती माजी उपसभापती तानाजी  =यमगर याची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम नंतर विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर श्री. पडळकर यांचा आटपाडी तालुका पत्रकार संघाचे वतीने सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते म्हणाले सांगली जिल्ह्य़ातील अधिकारी चांगले आहेत. त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर रात्रदिवस काम केले. 'माझ्यावर विकास कामाची मोठी जबाबदारी आहे आणि ती निश्चित यशस्वीपणे पार पाडेन. आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचा डावा कालवा, औद्योगिक वसाहतीचा प्रश्न यासह काही प्रश्न आहेत. तसेच राज्यभर काम करताना अनेकांनी प्रश्न मांडले आहेत. ह्याची मी नोंद केली आहे. काही प्रश्नावरती अभ्यास सुरू केला असून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच प्रयत्न सुरू केले जातील. यापुढे संघर्ष कमी आणि विकास कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. मात्र सर्वसामान्य लोकावर आणि कार्यकर्त्यावर कोणी अन्याय केला तर तेथे संघर्ष केला जाईल. रेशन कार्ड नसलेल्या लोकांनाही रेशन मधून धान्य देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कार्ड नसलेल्या लोकांनी यासंबंधी पुरवठा विभागाशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी त्यांना धान्य मिळेल. 

कर्नाटक शासनाने राज्यातील असंघटित कामगारांना लाकडाऊनमुळे पाच हजार रुपये अनुदान दिल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठा आधार मिळाला. महाराष्ट्रामध्ये शासनाने सर्व कामगारांना अनुदान द्यावे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. आशा वर्कर आणि इतर जे काम करत आहे त्यांच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन आर्थिक पाठबळ देणार आहे.आमदार गोपीचंद पडळकर 
 Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies