प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 14, 2020

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने कशामुळे  आत्महत्या केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. तो ३४ वर्षांचा होता. २०१३ मध्ये “काई पो छे” या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केल होत. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीवर आलेल्या बायोपिकमध्ये त्याने धोनीची व्यक्तीरेखा साकारली होती ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सुशांत सिंह यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनेक बॉलिवूड स्टारनी ट्विट करत त्याला श्रध्दांजली वाहली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise