Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनच्या काळातही वाचन संस्कृती घराघरात ; साहित्यिक बबन पोतदारांचा उपक्रम


लॉकडाऊनच्या काळातही वाचन संस्कृती घराघरात 
साहित्यिक बबन पोतदारांचा उपक्रम
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : संपूर्ण जगामध्ये कोरोनाची भीती असताना त्याच्यावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग सर्वत्र करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपल्या छुप्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला. याच लॉकडाऊनच्या काळात प्रतिथयश आणि नवोदित लेखकांचा कथाप्रेमी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी वाचन संस्कृती घराघरात पोहचवण्याचा उपक्रम राबवित मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर करण्याचा प्रभावी प्रयत्न साधला जात आहे.
या ग्रुपमध्ये नामवंत न्यायाधीश, पत्रकार, डॉक्टर, अधिकारी आणि प्रतिथयश लेखकांचा समावेश आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या ग्रुपवर दररोज एका लेखकाची कथा पाठवली जाते. या कथेच्या निर्मिती मागील कथा त्याविषयी लेखकाची भावना आणि लेखकाचा परिचय पाठवला जातो. या कथा वाचनानंतर  गटातील सदस्य वाचक म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. या प्रतिक्रियामधून नवोदितांना साहित्य लिहीण्यास उभारी मिळते. तर प्रतिथयश लेखकांच्या कथांमधून विविध पात्रे, निरीक्षण, प्रादेशिकता या माहितीबरोबरच लेखन कौशल्याचे मार्गदर्शन मिळते.
निवृत्त आयकर अधिकारी असणाऱ्या बबन पोतदार यांनी गुंजेचा पाला, आक्रित एका सत्याचा आवाज हे कथा संग्रह लिहिले आहेत. गुंतले ह्दय माझे ही चित्रपट कथा, मनाला भावलेली माणसे असे विपुल लेखन केले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी विशेष मार्गदर्शन सुरु ठेवले आहे.  समाज माध्यमांच्या काळात वाचन संस्कृती विशेषत: पुस्तक वाचन कमी होत असताना याच व्यासपीठाचा वापर करीत वाचन संस्कृती वाढवण्याचा उपक्रम ग्रामीण साहित्यिक श्री. पोतदार यांनी राबविला आहे. 

मातृ भाषेचे  प्रेम वृध्दिंगत करणे, नव्या पिढीला साहित्याची विशेषत: मराठी साहित्याची आवड निर्माण करणे. त्यासाठी नव्या माध्यमांचा मी वापर करीत आहे. नव्या पिढीमध्येही दमदार लेखन करणारे साहित्यिक निर्माण व्हावेत आणि माय मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सातत्याने व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
बबन पोतदार
मराठी साहित्यिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies