महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याला कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, June 12, 2020

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याला कोरोनाची लागण


महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याला कोरोनाची लागण
मुंबई : राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांना यांना देखील कोरोनाचा फटका  बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत.
याआधी कोरोनाची महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसेच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आता मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मुंडे यांनी 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते.

No comments:

Post a Comment

Advertise