झरे येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, June 6, 2020

झरे येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू


झरे येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : झरे ता.आटपाडी, जि.सांगली येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षाची महिला कोरोना पॉझिटीव्ह आली होती. सदर महिला दि. 26 मे रोजी मुंबईहून आली होती. या महिलेस अगोदरपासूनच मधूमेह, उच्चरक्तदाब, थायरॉईडचा विकार (हायपोथायरॉईडीजम) हे विकार होते. आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Advertise